Bhairavnath Mandir Kohor श्री भैरवनाथ मंदिर - कोहोर ह्या गावा मध्ये एकूण सहा - सात मंदिरे आहेत , त्यापैकी गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर आहे .
हे मंदिर १०८ पिठांपैकी एक प्रसिध्द असे जागृत देवस्थान या ठिकाणी आहे , हे देवस्थान पंचक्रोशीमध्ये नवसाला पावणारे या ख्यातीसाठी खूप प्रसिध्द आहे भैरवनाथ मंदिराचे मुख उत्तराभिमुख आहे
Bhairavnath Mandir Kohor |
मराठी महिना चैत्र पोर्णिमाच्या दिवशी श्री भैरवनाथ महाराजांची या गावामध्ये यात्रा भरते , गावातील वडिलधाऱ्या माणसांच्या शुभहस्ते विधिवत महापूजा व श्री सत्यनारायणची पूजा करून श्री भैरवनाथ ,जोगेश्वरी व भैरवनाथाची बहिण पुतळाबाई यांच्या मुर्तीची पालखीतून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते
Bhairavnath Mandir Kohor
श्री भैरवनाथाना चैत्रला सेंदूर लावला जातो हि परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेलेली आहे . दुसऱ्या दिवशी श्री भैरवनाथांच्या देवकाठीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते, हि देवकाठी गुढीपाडवाच्या मुहूर्तपासून यात्रा प्रारंभ होण्याधी १५ दिवस श्री भैरवनाथा मंदिराचे भक्त मंडळी बाहेर गावी फिरवत असतात व यात्रेचे एक प्रकारे आमंत्रण देत असतात आणि यात्रेच्या दिवसी मंदिरासमोर घेवून येत असतात .
Bhairavnath Mandir Kohor
यात्रेसाठी जिल्हा , तसेच तालुका स्तरावरुन व्यापारींमंडळी आपआपली दुंकाने मोठ्या संख्याने या यात्रेसाठी घेवून येण्याची गर्दी पाहवयास मिळत असते , गावकरण्यच्या मनोरंजनासाठी यात्रेच्या दिवशी रात्री कीर्तन ,भारुड ,खेळ ,तमाशे ,वाघ्यामुरळी तसेच शास्रीय गायन ,कलापथके ,नाटके चित्रपट शास्रीय कलगी तुरा इत्यादी कार्यक्रमाचे Bhairavnath Mandir Kohor गावकर्यांना मार्फत आयोजित करण्यात येते.
तसेच महिला ,तरुण वर्ग ,बालके यांच्यासाठी कृत्रिम दागिने ,खेळणी ,झोके ,खाद्य पदार्थ (गोडी शेव - भत्ता -जलेबी हि खास वैशिष्ट्य ) इ. गोष्टीने यात्रेच्या दिवशी एक वेगळीच शान येते त्याचप्रमणे शाळेच्या मैदानामध्ये विविध प्रकारचे पाळणे लागतात .यात्रेमध्ये लहान मुलांना हे मुख्य आकर्षण असते
0 Comments
हि कोणत्याही प्रकारची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाच्या संबधी नाही . कृपया याला offcial वेबसाईट म्हणून मानू नका हि वेबसाईट बनविण्यामागचा एक च उद्देश आहे कि कोहोर गावाविषय पूर्ण माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचावी