Kohor Gavavishay Mahiti कोहोर हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यातील व पेठ या तालुक्यातील एक सुंदर सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले असे गाव आहे .
हे उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील गाव आहे. नाशिक जिल्ह्यापासून पश्चिमेस सह्याद्री पर्वत रांगेतील जाहूली नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर असे गाव आहे.
Kohor Gavavishay Mahiti |
जिल्हा मुख्यालयापासून कोहोर हे साधारणपणे नाशिकच्या पश्चिम दिशेला ३५ किमी अंतरावर वसलेले आहे , तर
पेठ या तालुक्याच्या मुख्यालयापासून २१ किमी आंतरवर स्थित आहे , पोस्ट ऑफिस स्थित त्याचा पिन कोड नंबर - ४२२२०८ असा आहे
हे १०० % आदिवासी गाव असून गावात कोकणा , महादेव - कोळी, वारली ,कातकरी इत्यादी समाजातील लोक गुण्यागोविदाने एकत्रित पणे या ठिकाणी राहत आहेत
Kohor Gavavishay Mahiti
गावाच्या जवळील अन्य गावे - कोहोर ह्या गावाला लागून अनेक लहान मोठी खेडी पाडी रुइपेठा (४ किमी ), भायगाव (४ किमी) , हनुमान नगर (2 किमी) , लिंगवने (3 किमी) वाघ्याचीबारी (३ किमी ) आहेत , त्यांची मुख्य बाजार पेठ हे कोहोर गाव आहे.
स्थान - कोहोर गावाच्या पुवेस सहयाद्री पर्वतरांग आहे त्यामध्ये बोंडवज डोंगर आहे त्यामधून उगम पावणारी जाहुली ह्या नदीच्या काठावर कोहोर हे गाव वसलेले असल्याचे आपणास दिसून येते , त्याचप्रमणे उत्तेस कंसरा ( भायगाव ) डोंगर रांग स्थित आहे , तर पश्चिमेस लग्नाचा डोंगर आहे 'Kohor Gavavishay Mahiti'
२०११ च्या जनगणनेचे तपशील - कोहोर या गावाची स्थानिक भाषा हि मराठी आहे , या गावाची एकूण लोकसंख्या ३५८० असून घरांची संख्या ६०५ आहे . गावातील महिलांची लोकसंख्या ४९.५ % इतकी आहे गावातील लोकांचा साक्षरता दर ६७.१ % आणि महिलांची मधील साक्षरता दर ३२.२ % इतका आहे
0 Comments
हि कोणत्याही प्रकारची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाच्या संबधी नाही . कृपया याला offcial वेबसाईट म्हणून मानू नका हि वेबसाईट बनविण्यामागचा एक च उद्देश आहे कि कोहोर गावाविषय पूर्ण माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचावी