Datta Mandir Kohor मित्रानो या पेजवर आपण आता कोहोर या गावामध्ये गावाला लागून असलेल्या शासकीय आश्रम शाळेच्या परिसरामध्ये स्थित असणाऱ्या श्री दत्त मंदिराबद्दल माहिती पाहणार आहोत,


Datta Mandir Kohor
Datta Mandir Kohor


या दत्त मंदिराबद्दल माहिती पाहण्या अगोदर आपण थोडसे हिंदू पौराणिक साहित्य मध्ये आलेल्यात्रिमुखी दत्त बदल माहिती या ठिकाणी बघूया, दत्त, सोम, दुर्वास, हे तिघे भाऊ विष्णू, ब्रम्हा, शिव यांचे अवतार मानले गेलेले आहेत. 

Datta Mandir Kohor

पुर्वकाळामध्ये विष्णूचा अवतार मानलेल्या दत्ताचे रूप उतरत्याकाळात महेश, विष्णू, ब्रम्हा, या तिन्ही देवताचे एकत्रित रूप घेत त्रिमुखी रुपामध्ये उत्क्रमत गेले

दत्त हे एक योगी असून हिंदू धर्म त्यांना देव मानतो, या दत्त संप्रदायाने खरे स्वधर्म व स्वसंस्कृती अडचणीत असतानी त्याची गोपासना आणि त्याला संरक्षण देण्याचे महत्व पूर्ण असे कार्य केले गेल्याचे दिसून येत आहे 

संत तुकाराम, संत एकनाथ महाराज या सारख्या थोर मंडळींनी 'Datta Mandir Kohor' दत्ताचया त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंग वाणीतून केला आहे ,

गावातील शासकीय आश्रम शाळेच्या परिसरामध्ये कदम वृक्षाच्या खाली स्थित असणारे श्री दत्त मंदिर हे अत्यंत सुंदर वाटते आणि त्यामध्ये असणारी श्री दत्तांची त्रिमुखी रुपामध्ये असणारी हि सुंदर अशी मूर्ती मनमोहक असल्याची आपणास पहावयास मिळते

Datta Mandir

या मूर्तीचे उल्लेख करायचा ठरला तर मूर्तीला एकूण सहा हात आहेत आणि त्या प्रत्येक हातांमध्ये वेगवेगळी शस्त्रे धारण केलेली आहेत. 

माथ्यावर जटाभार, अंगावर विभूती, हातात शंखचक्र गदा, पायी खडावा, काखेत झोळी, गळ्यामध्ये रुद्राक्षच्या माळ, अंगावर भस्माचे पट्टे, मागच्या Datta Mandir Kohor बाजूस गाय अशा सुंदर व मनमोहक असे दिंगबररूप दिसून येते

Datta Mandir

दत्त जयंती – मार्गशीर्ष पोर्णिमाच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळच्या  वेळेत दत्त मंदिरामध्ये शाळेतील सर्व मुल-मुली व गावातील गावकरी मंडळी मिळून दत्ताचा जन्मोत्सव साजरा करतात.

सकाळी दत्तमंदिरामध्ये पूजा, दीप व आरती करून सुंठवडयाचा "Datta Mandir Kohor" प्रसाद वाटप करतात, आणि रात्रीच्या वेळेत मंदिरामध्ये गावातील गावकरी मंडळी कडून भजन, कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात.