Shri Nandikishwar Mandir Kohor मित्रानो या लेखामध्ये आज आपण कोहोर या परिसरातील अजून एका मंदिराविषयीची माहिती करून घेणार आहोत 

श्री क्षेत्र नंदीकिश्वर हे मंदिर गावापासून जवळच स्थित आहे त्या मंदिराविषयीची माहिती बघणार आहोत

Shri Nandikishwar Mandir Kohor
Shri Nandikishwar Mandir Kohor
देवाचा देव म्हणजेच महादेव असे नेहमीच आपण म्हणतो, भक्ती केल्यास सर्वात लवकर प्रसन्न होणार देव म्हणजे महादेव.. भारतात प्रत्येक गावामध्ये कुठे न कुठे महादेवाचे मंदिर पाहवयास मिळत असते आणि प्रत्येक मंदिराची एक वेगळी अशी ओळख असते    

Shri Nandikishwar Mandir Kohor

आपल्या भारत या देशामध्ये एकूण १२ ज्योतिर्लिग आहेत, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात ५ ज्योतिर्लिग आहेत 

आपल्या हिंदू संस्कृतीच्या मानणेतेनुसार कि जी व्यक्ती दिवसरात्र या १२ ज्योतिर्लिगाचा सतत नाम जप करते त्याचे सात जन्माचे पाप निघून जातात आपल्या शिव महा पुराणात या सर्व ज्योतिर्लिगाच्या कथाही सांगण्यात आलेल्या आहेत. 'Shri Nandikishwar Mandir Kohor'

आपल्या नाशिक जिल्हा धार्मिक परंपरा वारसा लाभलेला एक मोठा जिल्हा म्हणून ओळख आहे नाशिक जिल्ह्यात अनेक शिव मंदिर असल्याचे पाहवयास मिळते आणि या मंदिरामध्ये भाविक भाक्तिभावाने महादेवाचे दर्शन घेते असतात

आज आपण या लेखातून कोहोर या गावापासून  साधारणपणे १ किमीच्या अंतरावर असणाऱ्या श्री क्षेत्र नंदीकेश्वर ( शिव मंदिर ) या स्थळाची माहिती आणि महत्त्व जाणून घेणार आहोत.

Shri Nandikishwar Mandir

श्री क्षेत्र नंदीकेश्वर मंदिर परिसरात मोठे मोठे ४-५ भव्य असे वडाचे वृक्ष आपल्याला दिसून येतात त्याच महाकाय वृक्षाच्या खाली श्री क्षेत्र नंदीकेश्वर मंदिराची स्थापना झालेली पहावयास मिळत आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस एक तलाव आहे 

या तलावापासून साधरणपणे ५०-६० पायऱ्या चढून आल्यानंतर आपण मंदिरा पर्यंत येत असतो, मंदिराच्या समोर महादेवाचे वाहन नंदी Shri Nandikishwar Mandir Kohor प्रतिक्षेत बसलेल्या आसनात आपल्या नजरेस पडतो. 

महादेवाचे वाहन नंदी हा सतत प्रवासासाठी न थकणार सामर्थ्यशाली आणि चपळ वाहन असण गरजेच असल्याने महादेवानी नंदीला निवडल असाव. नंदीचे दर्शन घेतल्यानंतर समोर आपल्याला मुख्य मंदिर दिसते. 

Shri Nandikishwar

मंदिराच्या गर्भग्रहात प्रवेश करण्यापूर्वी एक दोन पायऱ्या उतरुन खाली जावे लागते. त्यामध्ये गर्भ ग्रहात थोड्या खड्डया उतरुन आल्यावर आपल्या नजरेस पिंड किवा लिंगरुपात महादेवाचे दर्शन मिळत असते, या शिव पिंडावर तांब्याच्या कळसातून दररोज जलाभिषेक पाण्याच्या धारेमधून हळुवारपणे चालू असते.

पेठ तालुक्यातील जोगविहीर या गावी प.पूज्य साधू स्वामी मंदाकिनी महाराजांची समाधी स्थित आहे, अशा या थोर महत पुरुषाने श्री क्षेत्र नंदीकेश्वर ( शिव मंदिर ) कोहोर याठिकाणी काही  "Shri Nandikishwar Mandir Kohor" दिवस तपश्चर्या केलेली असल्याचे हि सांगितले जाते.

या मंदिरामध्ये महाशिवरात्री असो वा श्रावणी सोमवार यानिमित या मंदिरात नेहमीच शिवभक्तांची गर्दी पहावयास मिळते, गावातील व परीसरातील भाविक मंदिरात जाऊन भाक्तिभावाने दर्शन घेत असतात. सन- २००४ सालापूर्वी “अखंड हरीनाम सप्ताह“ याच मंदिराच्या परिसरात पार पाडला जायचा, 

तसेच श्री भैरवनाथ यात्रे निमिताने आयोजित करण्यात येणारी कुस्त्यांची विराट दंगल देखील याच परिसरात पार पाडली जाते