Shri. Bhairavnath Jogeshwari Yatra Kohor मित्रानो आज आपण कोहोर या गावात भरवण्यात येणाऱ्या यात्रेबद्दल अधिकची माहिती बघणार आहोत, तरी हि माहिती तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करून आपण माहिती बघणार आहोत.
पेठ तालुक्यातील कोहोर या गावामध्ये दरवर्षी श्री. भैरवनाथ महाराज यात्रेचे आयोजन करण्यात येते. कोहोर या गावामध्ये साधरणता: तेराव्या शतकात भैरवनाथ जोगेश्वरी मातेच्या मुर्तीची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जाते.
Shri. Bhairavnath Jogeshwari Yatra Kohor |
बोहाडा हि आदिवासी समाजातील पद्धत अनेक शतकांपासून कोहोर या गावात भैरवनाथ यात्रेनिमित्त जपली जात आहे पावरी, ढोल, तारपा अशा आदिवासी पारंपारिक वाद्यांच्या गजरात विविध देवदेवतांची सोंगे घेऊन नाचवत मिरवणूक काढण्यात येते.
Shri. Bhairavnath Jogeshwari Yatra Kohor
श्री भैरवनाथ मंदिर १०८ पीठांपैकी एक प्रसिद्ध असे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर पंचक्रोशीमध्ये नवसाला पावणारे ह्या साठी म्हणून खूप प्रसिद्ध असे देवस्थान आहे. मराठी महिन्याच्या चैत्र शुक्ल पौर्णिमेला श्री भैरवनाथाची मंदिरच्या आवरामध्ये यात्रा भरते.
गावातील वडिलधाऱ्या माणसांच्या शुभहस्ते महापूजा व श्री सत्यनारायण पूजा व तसेच श्री भैरवनाथ , जोगेश्वरी व भैरवनाथांची बहिण पुतळाबाई यांच्या मुर्तीची पालखीतून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते आणि रात्री भैरवनाथांची जन्म कथा 'Shri. Bhairavnath Jogeshwari Yatra Kohor' ( जागरण ) डाकभक्तीच्या गाणाच्या कथेतून भक्त मंडळी सांगत असतात.
Shri. Bhairavnath Jogeshwari Yatra
Shri. Bhairavnath Yatra Kohor
यात्रेसाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावरुन व्यापारी मंडळी
आपआपली दुकाने मोठ्या संख्याने या यात्रेसाठी घेवून येण्याची गर्दी करावयास आपणास पाहवयास मिळत असते, यात्रेच्या दिवशी रात्री कीर्तन, भारुड, खेळ, तमाशे, वाघ्यामुरळी तसेच शास्रीय गायन, कलापथके, नाटके, चित्रपट, शास्रीय कलगी, तुरा इत्यादी कार्यक्रमाचे गावकर्यांना मार्फत आयोजित करण्यात येते.
तिसऱ्या दिवशी हनुमान जन्म उत्सव असतो त्या दिवसाच्या सकाळी ९:०० ते २:०० वाजे पर्यंत कुस्त्यांची विराट अशी दंगल आपणास "Shri. Bhairavnath Jogeshwari Yatra Kohor" बघावयास मिळते. कुस्त्यांचे ठिकाण - गावापासून जवळच असणाऱ्या श्री क्षेत्र नदीकिश्वोर महादेव मंदिराच्या आवारात घेण्यात येते
0 Comments
हि कोणत्याही प्रकारची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाच्या संबधी नाही . कृपया याला offcial वेबसाईट म्हणून मानू नका हि वेबसाईट बनविण्यामागचा एक च उद्देश आहे कि कोहोर गावाविषय पूर्ण माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचावी